२०११०३१९

"अणुविवेक" या पुस्तकाचे परिशिष्ट

अणुविवेक (लेखकः दिलीप कुलकर्णी, राजहंस प्रकाशन, चौथी आवृत्तीः ६ ऑगस्ट २००७, किंमत रु.८०/- फक्त) या पुस्तकाच्या परिशिष्टात दिलेले मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द इथे अकारविल्हे तसेच अल्फाबेटिकली रचून दिलेले आहेत.

लेखक म्हणतो, “अनेक वैज्ञानिक किंवा अन्य शब्द प्रथम इंज्रजीत वापरले गेले. असे शब्द मराठी विश्वकोशाची परिभाषा प्रमाण मानून या पुस्तकात वापरले आहेत. त्या त्या ठिकाणी अनेकवेळा मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेतच. पण नंतर एखाद्या शब्दाचा अर्थ कळला नाही, तर पूर्वीची पानं उलगडत बसण्याऐवजी इथे तो लगेच मिळावा म्हणून ’अवघड’ मराठी शब्दांचे मूळ इंग्रजी प्रतिशब्द पुढे दिलेले आहेत. मराठी शब्दांचा क्रम देवनागरी वर्णमालेनुसार आहे”

अकारविल्हे रचलेले

अक्र पुस्तकात वापरलेले मराठी प्रतिशब्द मूळ इंग्रजी शब्द

१ अग्निबाण Rocket
२ अणुक्रमांक Atomic number
३ अण्वस्त्र-प्रसार-बंदी Nuclear non-proliferation
४ अर्धायू, अर्धायुष्य Half life
५ अपमध्य पृथक्करण Centrifugal separation
६ अवपात Fall out
७ अवशिष्ट प्रारण Residual radiation
८ आयन-विनिमय Ion-exchange
९ आवर्त-सारणी Periodic table
१० आंतरखंडीय Inter-continental
११ इंधन, अणुइंधन Fuel, Atomic fuel
१२ उग्र ऊर्जा Hard energy
१३ उत्स्फूर्त विघटन Spontaneous disintegration
१४ उपाणू, कण Sub-atomic particles
१५ उर्वरिते, आण्विक उर्वरिते Nuclear waste
१६ उष्णता-रोधक Heat resistant
१७ उष्णता-विनिमयक Heat exchanger
१८ ऊर्जा-सघन Energy-intensive
१९ ऊष्मीय प्रारण Thermal radiation
२० अंतःस्फोट Implosion
२१ काचगृह परिणाम, काचगृह वायू Greenhouse effect, greenhouse gases
२२ क्रांतिक, उप-क्रांतिक आणि अति-क्रांतिक वस्तुमान Critical, sub-critical and super-critical mass
२३ किरणोत्सर्जन Radio-activity
२४ केंद्र Nucleus
२५ गाभा Core
२६ ग्रास Absorption
२७ गुहा Silo
२८ जड पाणी Heavy water
२९ जनक द्रव्य Fertile material
३० जनित्र Generator
३१ तात्कालिक प्रारण Prompt radiation
३२ त्रिपाद-व्यूह Triad
३३ द्रव्यमानांक Mass number
३४ द्रायू Plasma
३५ द्रावण Solution
३६ ध्वम्‌ Bomb
३७ धातुक Ore
३८ निष्कलंक पोलाद Stainless steel
३९ निष्पन्न इंधन Extracted fuel
४० नियंत्रक Controller
४१ निरोधन Deterrence
४२ परस्परांचा संपूर्ण विनाश Mutually assured destruction (MAD)
४३ परोक्ष युद्ध Proxy war
४४ पुनःप्रक्रिया Reprocessing
४५ प्रघाती तरंग Shock waves
४६ प्रजनक, शीघ्र प्रजनक (विक्रियक) Breeder, fast breeder (reactor)
४७ प्रक्षेपक: पहा, अग्निबाण Rocket
४८ प्रारण Radiation
४९ पारंपरिक ऊर्जा-स्त्रोत Conventional energy sources
५० पार्श्वभूमिक किरणोत्सर्जन Background radiation
५१ बंधनऊर्जा Binding energy
५२ भंजन Fission
५३ भंजनक्षम द्रव्य Fissile material
५४ भंजन-विक्रिया, भंजन-साखळी Fission reaction, fission-chain- reaction
५५ मार्गण Traces
५६ मात्रा Dose
५७ मीलन, संमीलन Fusion
५८ मूलभूत घटक Basic building blocks
५९ मंदायक Moderator
६० युरेनियमोत्तर उर्वरिते Trans-uranic waste
६१ रणक्षेत्रीय अस्त्रं Tactical weapons
६२ लवण Salt
६३ व्यूहात्मक अस्त्रं Strategic weapons
६४ वाफचक्की Turbine
६५ विक्रियक Reactor
६७ विद्राव Solution
६८ विसरण Diffusion
६९ शलाका Beam
७० श्रम-सघन Labor-intensive
७१ शीतक Coolant
७२ शीत-युद्ध Cold war
७३ श्रुंखला-विक्रिया Chain-reaction
७४ समस्थानिक Isotope
७५ स्खलनशील Fallible
७६ स्फोटक Explosive
७७ सौम्य ऊर्जा Soft energy
७८ संगणक Computer
७९ संपन्नीकरण Enrichment
८० संमीलन: पहा, मीलन Fusion
८१ संसाधने Resources
८२ क्ष-किरण X-rays

यांपैकी खालील शब्द मला स्वतःला योग्य वाटत नाहीत. कारण मला त्यांच्याकरता निराळेच प्रचलित असलेले शब्द योग्य वाटत आहेत.

मला योग्य वाटत नसलेले शब्द

१. अपमध्य पृथक्करण=Centrifugal separation,
२. उर्वरिते, आण्विक उर्वरिते=Nuclear waste,
३. द्रायू=Plasma,
४. निरोधन=Deterrence,
५. प्रघाती तरंग=Shock waves,
६. भंजन=Fission,
७. मंदायक=Moderator,
८. विक्रियक=Reactor,
९. विद्राव=Solution,
१०. संपन्नीकरण=Enrichment

या शब्दांकरता मला योग्य वाटणारे शब्द खाली अनुक्रमेच दिलेले आहेत

१. केंद्रापकर्षी पृथक्करण,
२. अवशिष्टे, आण्विक अवशिष्टे,
३. प्राकल (कारण द्रायू म्हणजे fluids),
४. परावृत्तक,
५. धक्का तरंग,
६. विदलन (संदलन=Fusion),
७. अवमंदक,
८. प्रक्रियक,
९. द्रावण,
१०. समृद्धीकरण

तरीही, जोपर्यंत तज्ञांतील एकमतीने निर्णय होत नाही, आणि त्या त्या पर्यायी शब्दाचे एकमेवाद्वितीयत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत तसेच पुनरनुवादात मूळ शब्द येऊ शकेपर्यंत, सर्व उपलब्ध पर्यायी शब्द प्रसारात राहावेत असे माझे स्वतःचे मत आहे.

अल्फाबेटिकली रचलेले तेच शब्द

अक्र मूळ इंग्रजी शब्द पुस्तकात वापरलेले मराठी प्रतिशब्द

१ Absorption ग्रास
२ Atomic number अणुक्रमांक
३ Background radiation पार्श्वभूमिक किरणोत्सर्जन
४ Basic building blocks मूलभूत घटक
५ Beam शलाका
६ Binding energy बंधनऊर्जा
७ Bomb ध्वम्‌
८ Breeder, fast breeder (reactor) प्रजनक, शीघ्र प्रजनक (विक्रियक)
९ Centrifugal separation अपमध्य पृथक्करण
१० Chain-reaction श्रुंखला-विक्रिया
११ Cold war शीत-युद्ध
१२ Computer संगणक
१३ Controller नियंत्रक
१४ Conventional energy sources पारंपरिक ऊर्जा-स्त्रोत
१५ Coolant शीतक
१६ Core गाभा
१७ Critical, sub-critical and super-critical mass क्रांतिक, उप-क्रांतिक आणि अति-क्रांतिक वस्तुमान
१८ Deterrence निरोधन
१९ Diffusion विसरण
२० Dose मात्रा
२१ Energy-intensive ऊर्जा-सघन
२२ Enrichment संपन्नीकरण
२३ Explosive स्फोटक
२४ Extracted fuel निष्पन्न इंधन
२५ Fall out अवपात
२६ Fallible स्खलनशील
२७ Fertile material जनक द्रव्य
२८ Fissile material भंजनक्षम द्रव्य
२९ Fission भंजन
३० Fission reaction, fission-chain- reaction भंजन-विक्रिया, भंजन-साखळी
३१ Fuel, Atomic fuel इंधन, अणुइंधन
३२ Fusion मीलन, संमीलन
३३ Fusion संमीलन: पहा, मीलन
३४ Generator जनित्र
३५ Greenhouse effect, greenhouse gases काचगृह परिणाम, काचगृह वायू
३६ Half life अर्धायू, अर्धायुष्य
३७ Hard energy उग्र ऊर्जा
३८ Heat exchanger उष्णता-विनिमयक
३९ Heat resistant उष्णता-रोधक
४० Heavy water जड पाणी
४१ Implosion अंतःस्फोट
४२ Inter-continental आंतरखंडीय
४३ Ion-exchange आयन-विनिमय
४४ Isotope समस्थानिक
४५ Labor-intensive श्रम-सघन
४६ Mass number द्रव्यमानांक
४७ Moderator मंदायक
४८ Mutually assured destruction (MAD) परस्परांचा संपूर्ण विनाश
४९ Nuclear non-proliferation अण्वस्त्र-प्रसार-बंदी
५० Nuclear waste उर्वरिते, आण्विक उर्वरिते
५१ Nucleus केंद्र
५२ Ore धातुक
५३ Periodic table आवर्त-सारणी
५४ Plasma द्रायू
५५ Prompt radiation तात्कालिक प्रारण
५६ Proxy war परोक्ष युद्ध
५७ Radiation प्रारण
५८ Radio-activity किरणोत्सर्जन
५९ Reactor विक्रियक
६० Reprocessing पुनःप्रक्रिया
६१ Residual radiation अवशिष्ट प्रारण
६२ Resources संसाधने
६३ Rocket अग्निबाण
६४ Rocket प्रक्षेपक: पहा, अग्निबाण
६५ Salt लवण
६७ Shock waves प्रघाती तरंग
६८ Silo गुहा
६९ Soft energy सौम्य ऊर्जा
७० Solution द्रावण
७१ Solution विद्राव
७२ Spontaneous disintegration उत्स्फूर्त विघटन
७३ Stainless steel निष्कलंक पोलाद
७४ Strategic weapons व्यूहात्मक अस्त्रं
७५ Sub-atomic particles उपाणू, कण
७६ Tactical weapons रणक्षेत्रीय अस्त्रं
७७ Thermal radiation ऊष्मीय प्रारण
७८ Traces मार्गण
७९ Trans-uranic waste युरेनियमोत्तर उर्वरिते
८० Triad त्रिपाद-व्यूह
८१ Turbine वाफचक्की
८२ X-rays क्ष-किरण
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिसाद द्यायचाय? अवश्य द्या.